Chandrpur Tiger special Report : वाघाची झडप, आठ मृत्यू! चंद्रपुरात हल्ल्याचं सत्र सुरुच
Chandrpur Tiger special Report : वाघाची झडप, आठ मृत्यू! चंद्रपुरात हल्ल्याचं सत्र सुरुच
चंद्रपूर जिल्हा पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षामुळे चर्चेत आलाय.. अर्थात त्याला कारण आहे वाघाची दहशत.. चंद्रपुरात गेल्या आठ दिवसात आठ जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय.. पोटाची खळगी भरण्यासाठी वन्यजीवांचा धोका पत्कारत जंगलात जाऊन
तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या स्थानिकांना वाघाने लक्ष्य केलंय... पाहूया चंद्रपुरातील वाघाच्या दहशतीवरचा एक स्पेशल रिपोर्ट.. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे सिंचनाअभावी शेतीत मागास आहेत. विशेष म्हणजे याच जिल्ह्यांमध्ये एकीकडे वाघांची संख्या वाढत आहे मात्र दुसरीकडे मागास शेतीमुळे लोकांची जंगलावरील निर्भरता कमी होतांना दिसत नाही. त्यामुळेच वाघांच्या जंगलावर अवलंबून असलेल्या स्थानिकांना वाघाचं शिकार होण्याची वेळ येतेय वाघाच्या अधिवासात गेल्यानंतर वाघ हल्ला करणारच त्यामुळे अशा घटना थांबवण्यासाठी वनविभाग काय उपाययोजना आखणार? सोबतच उत्पन्नाचा काही वेगळा पर्याय शासन स्तरावरुन उपलब्ध करुन दिला जाणार का?





















