एक्स्प्लोर

''प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला; वाल्मिक कराडला अटक झाली का नाही, हे मला माहिती नाही''

भाजप आमदार सुरेश धस यांनी आज बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी पाठक हे जवळपास एक महिना प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेले होते.

बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ज्यांनी वाचा फोडली ते आमदार सुरेश धस (Suresh Dhas) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणात पीडित देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आरोपींच्या अटकेची मागणी करत आहेत. त्यानंतर, जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत बीडमध्ये मोर्चा काढला होता. त्यामध्येही धस यांनी त्यांच्यास्टाईलने भाषण करत बीडमधील दोन्ही मंत्र्‍यांवर हल्लाबोल केला. मात्र, दुसरीकडे यासंदर्भाने टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचे (Prajakta Mali) नाव घेतल्याने वेगळाच वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांची तक्रारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आता, सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्राजक्ता माळी व संतोष देशमुख प्रकरणावर पुन्हा भाष्य केलं आहे.   

भाजप आमदार सुरेश धस यांनी आज बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी पाठक हे जवळपास एक महिना प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेले होते. त्यानंतर ते आजच रुजू झाले आहेत. त्यामुळे, जिल्हाधिकारी रुजू झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी पाठक यांची भेट घेऊन संतोष देशमुख यांच्या खूनासंदर्भात चर्चा केली. बीड जिल्ह्यात देण्यात आलेल्या बंदुकीच्या परवान्यासंदर्भात धस यांनी चर्चा करुन हे परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यावर, तपास करुन 1 हजार परवाने रद्द करण्याचं आश्वासनही धस यांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पुढील 8 ते 15 दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये, असेही धस यांनी म्हटलं. लोकप्रतिनीधींनीही शिफारस केल्याची नोंद असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी. माझं नाव कुठं आढळून आल्यास माझ्यावरही करावी. कारण, मी स्वत: अद्याप बंदुक वापरत नाही. केवळ दोन परवान्यांसाठी मी शब्द टाकला होता, तेही श्वापदांपासून बचावासाठी म्हणून एका डॉक्टरांना ही बंदुक मिळावी म्हणून आपण शिफारस केल्याचंही धस यांनी म्हटलं.

आका आतमध्ये गेल्याची माहिती नाही

आरोपींच्या संपत्ती जप्तीची कारवाई तातडीने व वेगवान पद्धतीने झाली पाहिजे, अशी विनंती मुख्यमंत्र्‍यांकडे करतो. केवळ लाख, कोटी रुपयांची ही संपत्ती नसून शेकडो कोटींची संपत्ती असल्याचंही धस यांनी म्हटलं. वाल्मिक कराडला अटक करण्यात आली का, याबाबत जोपर्यंत कन्फर्म माहिती सीआयडीकडून येत नाहीत, तोपर्यंत आका आतमध्ये गेलाय का हे मी सांगणार नाही. अद्याप ते आतमध्ये गेल्याची माहिती माझ्याकडे नाही, असेही धस यांनी म्हटलं. 

प्राजक्ता माळी हा विषय माझ्यासाठी संपलाय

तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे, माझी बाजू अनेकांनी मांडली आहे. कृपया संतोष देशमुख हत्याप्रकरणाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे म्हणत प्राजक्ता माळींच्या तक्रारीवर अधिक बोलण्यास आमदार सुरेश धस यांनी नकार दिला.  

हेही वाचा

Video: धक्कादायक! क्रिकेट खेळताना मैदानावर अटॅक येऊन जागीच मृत्यू; 32 वर्षीय तरुण कोसळला

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay deshmukh: सुशील कराडने फेसबुक पोस्ट न करता पत्रकार परिषद घ्यावी अन्...; धनंजय देशमुखांनी एकाच वाक्यात विषय संपवला
सुशील कराडने फेसबुक पोस्ट न करता पत्रकार परिषद घ्यावी अन्...; धनंजय देशमुखांनी एकाच वाक्यात विषय संपवला
Santosh Deshmukh Case: आम्हाला कागदपत्र देत नाहीत, सरकारी पक्षाकडूनच दिरंगाई; उज्वल निकम अन् आरोपींच्या वकिलामध्ये खडाजंगी, कोर्टात नेमकं काय घडलं?
आम्हाला कागदपत्र देत नाहीत, सरकारी पक्षाकडूनच दिरंगाई; सरपंच संतोष देशमुख प्रकरणात उज्वल निकम अन् आरोपींच्या वकिलामध्ये खडाजंगी, कोर्टात नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: महादेव मुंडेंना धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून संपवलं, राजाभाऊ फड यांच्या आरोपावर मुंडे समर्थकांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
महादेव मुंडेंना धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून संपवलं, राजाभाऊ फड यांच्या आरोपावर मुंडे समर्थकांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 दुचाकींसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक 
बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 दुचाकींसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक 

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget