एक्स्प्लोर

Udayanraje Bhosale : शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला

Makarand Aba Patil and Udayanraje Bhosale Meeting : मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मकरंद पाटील यांनी घेतल्यानंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया समोर आलेली आहे.

सातारा : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील (Makarand Aba Patil ) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची साताऱ्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मंत्रीपद मिळाल्यानंतर ते प्रथमच उदयनराजे यांच्या भेटीला पोहचले. यावेळी उदयनराजेंनी त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सन्मान केला. मकरंद पाटील यांनी त्यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे प्रतिक्रिया देताना शरद पवार हे देशातले राजकारणातील सीनियर असल्यामुळे त्यांनी यापुढे युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचा सल्लाही दिला. 

मकरंद पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर मकरंद पाटलांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. मकरंद पाटील हे साताऱ्यातील वाई मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारीही देण्यात आली. 

मकरंद पाटलांच्या भेटीनंतर उदयनराजेंनी काय म्हटलं?

उदयनराजेंनी मकरंद पाटलांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जलमंदिर हे मकरंद आबांचे घर आहे.मला ते भेटायला आले खूप आनंद झाला. सर्व मतदार म्हणजेच कुटुंब अशा पद्धतीने मकरंद पाटील हे कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीत शरद पवार उमेदवाराला पाडा, पाडा, पाडा हे वक्तव्य करतील ही मला अपेक्षा नव्हती. शरद पवारांनी मागे जे साम्राज्य उभे केले होतं,त्यांच्या पाठीशी मकरंद पाटील यांचे वडील लक्ष्मण पाटील होते. त्यामुळे मकरंद पाटलांनी काही काम केल नसतं तर मान्य होतं. 

पुढे त्यांनी म्हटलं की, शरद पवार हे राजकारणात महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील सीनियर आहेत. त्यांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम करायला हवे.शरद पवार हे पितृतुल्य आहेत, त त्यांनी आता यापुढील पिढीला प्रोत्साहन देण्याचे काम केले पाहिजे. हे करणं आता जनतेला अपेक्षित आहे. मकरंद पाटील यांच्या रूपाने न्याय मिळाला मला खूप आनंद झाला. 

मकरंद पाटील यांनी काय म्हटलं?

मकरंद पाटील यांनी म्हटलं की, निवडणुकीच्या दरम्यान उदयनराजेंनी माझ्यासाठी जी भाषणं केलीत त्याचा चांगला लाभ झालाय. आमचे पहिल्यापासूनच मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांच्या कायम सदिच्छा माझ्यासोबत होत्या.  आज उदयनराजेंचे आभार मानण्यासाठी मी आलो आहे. 

ही बातमी वाचा : 

Walmik Karad: वाल्मिक कराडला काल रात्रीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या?; सीआयडीने दिली महत्वाची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळू खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळू खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sliver Rate Hike Buldhana : चांदी चकाकली! 1 किलो चांदीसाठी मोजावे लागणार 1 लाख रुपयेKaruna Sharma on Dhananjay Munde : 6 महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 15 March 2025Supriya Sule On Devendra Fadnavis:महाराष्ट्राच्या स्थितीवर एकत्रित चर्चा व्हावी,सुप्रियाताईंची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळू खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळू खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
Embed widget