Chandrakant Patil Sudhir Mungantiwar On Vinod Tawade : तावडेंची नवी भरारी,मोठी जबाबदारी?
लोकसभेनंतर विनोद तावडेंना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे...
विनोद तावडेंना मोठी जबाबदारी मिळू शकते असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय... तर तावडेंनी केंद्रात कर्तृत्व सिद्ध केलंय अशी स्तुती सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय...
त्यामुळं तावडेंना नेमकी कोणती जबाबदारी मिळणार? याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत..
कोल्हापूर: देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार (NDA) स्थापन झाल्यानंतर केंद्रीय स्तरावर भाजपकडून काही फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर एनडीए सरकारमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपकडून (BJP) नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याजागी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांची वर्णी लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सूचक वक्तव्य केले आहे. विनोद तावडे यांना काय द्यायचे, हे केंद्र ठरवेल. भाजप पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे की, आमचं ज्या स्तरावर ठरतं ती गोष्ट शेजारच्या मुंगीलासु्द्धा कळत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.