एक्स्प्लोर
Shirdi Scam: 'पोलीस कारवाई करत नव्हते म्हणून न्यायालयात गेलो', तक्रारदार Sanjay Kale यांचा खुलासा
शिर्डी येथील साई संस्थानमधील (Shirdi Sai Sansthan) मोठ्या अपहाराचे प्रकरण समोर आले आहे, ज्यात ४७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार संजय काळे (Sanjay Kale) यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 'विद्युत विभागातल्या झालेल्या ह्या अप्रिय घटनेच्या चोरीच्या संदर्भामध्ये मी शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली,' असे तक्रारदार संजय काळे यांनी म्हटले आहे. साई संस्थानच्या अखत्यारीतील साई आश्रमामधून २०१२ मध्ये सुमारे ७७ लाख १३ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे विद्युत साहित्य चोरून त्याचा अपहार केल्याचा आरोप आहे. अनेक वर्षे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यानंतर, अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गुन्हा दाखल झाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















