BMC Furniture Scam Mumbai : सकारात्मक शेऱ्यासाठी कंत्राटदारालाच मागितली लाच
BMC Furniture Scam Mumbai : सकारात्मक शेऱ्यासाठी कंत्राटदारालाच मागितली लाच
मुंबई : शहराच्या सुशोभीकरणात स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यातच आता हे सुशोभीकरण (BMC Beautification Project Scam) करणारे कंत्राटदार देखील गंभीर आरोप करत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईच्या सुशोभीकरणात जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या रेलिंगचे गुणवत्ता परीक्षण रिपोर्ट पॉजिटिव्ह देण्यासाठी व्हीजेआयटीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल पन्नास लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. सिद्धी साई इन्फ्रा या कंत्राटदाराने यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं आहे.
अधिकाऱ्यांनी मागितलेले 50 लाख रुपये दिले नाहीत म्हणून अमेरिकेत बसून त्या अधिकाऱ्याने मुंबईतील गुणवत्ता परीक्षणाचा अहवाल निगेटिव्ह दिल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. कंत्राटदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित त्याचे पुरावेही सादर केले आहेत.
सांताक्रूज येथील मिलन सबवेचे सुशोभीकरण करण्यासाठी साई सिद्धी इंफ्रा या कंपनीला पालिकेचे दीड कोटीचे कंत्राट मिळाले. सदर कंपनीने सुशोभिकरण आणि रस्त्यांच्या कडेला रेलिंग उभारण्याचे सर्व काम पूर्ण ही केले. मात्र इथे मोनोपॉली असलेल्या कंत्राटदारांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली.