एक्स्प्लोर
Mama Rajwade Nashik : भाजप पदाधिकारी मामा राजवाडेंच्या अडचणीत वाढ, नवा गुन्हा दाखल
नाशिकमधील भाजप (BJP) पदाधिकारी मामा राजवाडे (Mama Rajwade) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गंगापूर रोड गोळीबार प्रकरणी (Gangapur Road Firing Case) न्यायालयीन कोठडीत असतानाच, त्यांच्यावर विनयभंग, खंडणी आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आणखी एक गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) दाखल झाला आहे. 'पंचवटीतील एका बार चालकाकडून पन्नास हजार रुपयांचा हप्ता उकळण्यासाठी हे कृत्य केल्याचा' आरोप आहे. राजवाडे आणि त्यांच्या साथीदारांवर हा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यासमोरील अडचणी अधिकच वाढल्या आहेत. गोळीबार प्रकरणानंतर आधीच कोठडीत असलेल्या राजवाडे यांच्यावर या नव्या गंभीर गुन्ह्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















