Bhaskar Jadhav On Bharat Gogawale : उद्धव ठाकरे सीएम पदी योग्य होते हे सांगण्याचा गोगावलेंचा प्रयत्न
Bhaskar Jadhav On Bharat Gogawale : उद्धव ठाकरे सीएम पदी योग्य होते हे सांगण्याचा गोगावलेंचा प्रयत्न आज विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Session 2024) तिसरा दिवस आहे. काल (दि. 29) अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला. विरोधकांनी अर्थासंकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तर सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. तर आज तिसऱ्या दिवशी कामकाज सुरु होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून आले. सुरुवातीला सत्ताधारी पक्षांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. किस्सा कुर्सी का? असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर व्यंगचित्रातून टीका करण्यात आली. एक आघाडी बारा भानगडी, गांव बसा नही लुटेरे आ गए, अशा जोरदार घोषणा सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे नेते (Bhaskar Jadhav) आणि शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली.
![Harshwardhan Sapkal : काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षांचा अजेंडा काय? हर्षवर्धन सपकाळ EXCLUSIVE](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/ea34358efafa0c593e026bae07cd4ad91739506651863976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 14 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/a80dff2d232f74f3fd0f9d494a2617fc1739505318125976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Akola Tukaram Bidkar Accident : ट्रकच्या धडकेत मृत्यू, माजी आमदार तुकाराम बिडकरांच्या अपघाताचा CCTV](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/1c1c9298f4bad0203bdfaef78e7021a01739503926546976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 14 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/b03cf665f286bd8404ccddcde98af6db1739498613281976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![City 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 13 February 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/a816eda91d530bae918d7812d0c1c535173946401707590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)