BEED : नियमांचं उल्लंघन केल्यास आस्थापनं सील होणार, बीड जिल्हा प्रशासनाचे आदेश
बीड जिल्ह्यामध्ये लसीकरणासाठी नागरिकांनी पाठ फिरवल्याने प्रशासनाने आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे सर्व मोठी व्यवसाय आणि उद्योग, हॉटेल, हॉस्पिटल, मॉल, पेट्रोल पंप होलसेल दुकान आणि सर्वच आस्थापनांना नो लस नो एंट्री बंधनकारक करण्यात आली आहे लसीचे डोस ज्यांनी पूर्ण केले त्यांना आता एन्ट्री मिळणार आहे नवीन नियमांचे उल्लंघन केल्यास उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स मॉल्स पेट्रोल पंप आणि आस्थापना तील सर्वात दुकान वरती सील करण्याची कारवाई केली जाईल व्यवसायिकांबरोबरच त्यांच्या कर्मचार्यांना लसीचा किमान एक डोस घेणे आवश्यक असून घेतला नसल्यास त्यांना दुकाने उघडता येणार नाहीत, शिवाय शासकीय-निमशासकीय कार्यालयात देखील लस घेतली नसल्यास (नो व्हॉक्सिन नो इंट्री) प्रवेश दिला जाणार नाही.




















