एक्स्प्लोर

मुंबईकरांना सलग तिसरा धक्का, सीएनजी-पीएनजीचे दर वाढले, पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर काय घडलं?

CNG आणि PNG : महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजीचे नवे दर मध्यरात्रीपासून लागू होतील.

CNG Price Hike मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून विविध देशांवर टॅरिफ लादण्यात आलं आहे. भारतावर 26 टक्के टॅरिफ लादण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी 9 एप्रिलपासून होणार आहे. याच दरम्यान शेअर मार्केट कोसळल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. सोमवारी (7 एप्रिलला) पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्यात आल्यानं त्याचे दर महागले होते. त्यानंतर सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आता मुंबईत पीएनजी आणि सीएनजीचे दर देखील वाढणार आहेत. महागनगर गॅस लिमिटेडनं  दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
डोमेस्टिक गॅसच्या एक्सचेंज रेटमध्ये वाढ झाल्यानं महागनगर गॅस लिमिटेडकडून पीएनजी आणि सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएनजीचे दर 1 रुपयानं तर सीएनजीचे दर 1.50  रुपये प्रति किलो प्रमाणं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत हा निर्णय 8 एप्रिलच्या आणि 9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासू लागू होईल.  महानगर गॅस लिमिटेडनं बदललेल्या दरानुसार पीएनजीसाठी  49 रुपये प्रति SGM असेल. तर सीएनजीचे दर देखील वाढवण्यात ले असून ते 79.50 रुपये असतील. सीएनजीचे दर 79.50 रुपये प्रति किलो असेल. 

महानगर गॅसनं दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या सध्याच्या दरांच्या तुलनेत सीएनजी अनुक्रमे 47 टक्के आणि 12 टक्के स्वस्त आहे. महानगर गॅसच्या ग्राहकांनी बिलं भरण्याचं आवाहन केलं आहे.  
  
पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आणि गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानंतर मुंबईकरांना आणखी एक धक्का बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळं मुंबईतील प्रवास महागण्याची शक्यता आहे. 

महागनर गॅस लिमिटेडच्या निर्णयानंतर आज मध्यरात्री 12 पासून नव्या दरानं प्रमाणं सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना खरेदी करावा लागेल नव्या दरानं सीएनजीची विक्री केली जाईल.  एक किलोग्राम सीएनजी 79.50 रुपये द्यावे लागणार आहेत. पाईपलाईन गॅसद्वारे दिल्या जाणाऱ्या गॅसचा दर 49 रुपये प्रति यूनिट असेल. याबाबतची माहिती एमजीएलकडून देण्यत आली आहे. आमच्या सर्व बहुमूल्य ग्राहकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असं महानगर गॅस लिमिटेडनं म्हटलं आहे.  

रिक्षा भाडं वाढणार?

एमएमआर रिजनमध्ये मोठ्या संख्येनं रिक्षा, टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनं सीएनजीवर चालतात. त्यामुळं सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर रिक्षा भाडं देखील वाढवण्यात यावं अशी मागणी केली जाऊ शकते. दरम्यान. महानगर गॅसच्या वतीनं लोकांना सांगण्यात आलं की ते स्वच्छ,पर्यावरणातील चांगले बदल याचा वापर करत आहेत.  

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
Embed widget