एक्स्प्लोर
RBI Repo Rate : आरबीआयच्या निर्णयाकडे लक्ष, रेपो रेट किती घटवणार? गृहकर्जाचा व्याज दर 8 टक्क्यांच्या खाली येणार?
RBI Repo Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक सुरु आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा पतधोरण उद्या सकाळी 10 वाजता जाहीर करतील.
आरबीआय
1/5

आर्थिक वर्ष 2025-26 मधील पहिलं पतधोरण आरबीआयकडून जाहीर केलं जाणार आहे. आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
2/5

बाजार आणि अर्थशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार आरबीआयकडून रेपो रेट 25 बेसिस पॉईंटची कपात केली जाऊ शकते. जर, रेपो रेट 6 टक्क्यांवर आला तर गृहकर्जाचे व्याज दर 8 टक्क्यांच्या खाली येऊ शकतात. सध्या बँक आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या 8.10 टक्के ते 8.75 टक्के व्याजदरावर कर्ज देत आहेत.
Published at : 08 Apr 2025 10:00 PM (IST)
आणखी पाहा























