एक्स्प्लोर

Deenanath Mangeshkar Hospital : दीनानाथ रुग्णालयात लोकांचे कपडे बघूनच प्रवेश देतात, रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप

Deenanath Mangeshkar Hospital : शासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ताब्यात घेतले पाहिजे आणि त्यावर प्रशासक नेमला पाहिजे, अशी मागणी देखील रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर (Deenanath Mangeshkar Hospital) या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. रुग्णालयाने उपचारांसाठी 10 लाख रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप केला जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यात राज्य शासनाच्या समितीचा अहवाल काल (दि. 07) सादर झाला. त्यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. आता या प्रकरणावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी रुग्णालय प्रशासनावर खळबळजनक आरोप केलाय. 

रवींद्र धंगेकर म्हणाले की, मंगेशकर परिवाराचे योगदान या देशासाठी महत्त्वाचे आहे. पण मंगेशकर परिवार आणि हॉस्पिटल हा भाग वेगळा आहे. मंगेशकर कुटुंबियाच्या नावाने सरकारने हॉस्पिटलला करोडो रुपयाची जागा मोफत दिली आहे. महानगरपालिकेचा 27 कोटी रुपयांचा टॅक्स बाकी आहे. त्यांना शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड झालेला आहे, तो देखील त्यांनी भरलेला नाही. हे सगळं कोणाच्या जिवावर चालते? यांच्या पाठीशी कोण आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.   

दीनानाथ रुग्णालयात लोकांचे कपडे बघूनच प्रवेश देतात

रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात लाखो पेशंट येत असतात. त्या पेशंटला कशा पद्धतीने ट्रीट केले जाते? हे आपण बघितले आहे. संचालक तिथे मालक म्हणून वावरतात. त्यांना राजकीय सपोर्ट असल्याने आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, या धुंदीत ते वागतात. दीनानाथ रुग्णालयात लोकांचे कपडे बघून आतमध्ये प्रवेश दिला जातो, असा आरोप त्यांनी यावेळी केला.   

हॉस्पिटल सरकारने ताब्यात घेऊन प्रशासक नेमावा

तिथे कुठल्याही नियमाप्रमाणे वागले जात नाही. तिथे कमर्शिअल व्यवसाय होत असल्याने रुग्णाला कुठेही दिलासा मिळत नाही. शासनाने हे रुग्णालय ताब्यात घेतले पाहिजे आणि यावर प्रशासक नेमला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. तर याआधी देखील रुग्णालयावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांच्यावर दंड आकारला आहे. मात्र रुग्णालयाने दंड भरलेला नाही. ते मनमानी कारभार करतात. जो पर्यंत यांच्यावर कारवाई होणार नाही, तोपर्यंत यावर काही बोलता येणार नाही, असे देखील रवींद्र धंगेकर म्हणाले. राज्य सरकारने या हॉस्पिटलला वेगवेगळे सुविधा दिल्या आहेत. या हॉस्पिटलने आतापर्यंत कोट्यावधी रुपयाचा कर देखील थकवला आहे, असा आरोप देखील रवींद्र धंगेकर यांनी केलाय. 

आणखी वाचा 

Deenanath Mangeshkar Hospital: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर, कारवाईला वेग येणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SSC Result 2026 Marathi: मोठी बातमी: दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास
SSC Result: मोठी बातमी: दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास
पुण्यातील खेड शिवापूर टोलजवळ भीषण अपघात! गॅस टँकरची दुचाकीला जोरदार धडक, पती पत्नीचा जागीच मृत्यू
पुण्यातील खेड शिवापूर टोलजवळ भीषण अपघात! गॅस टँकरची दुचाकीला जोरदार धडक, पती पत्नीचा जागीच मृत्यू
Ravi Pandit Passes Away: पुण्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित यांचे निधन, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पटकावले होते स्थान
पुण्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित यांचे निधन, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पटकावले होते स्थान
Pune Crime News: जामिनावर बाहेर येताच पाचव्या दिवशी 'गेम'! पुण्यात तरूणीवर हल्ला केलेल्या आरोपीला मध्यरात्रीचं संपवलं, आधी केलेल्या गुन्ह्यामुळं गमावला जीव
जामिनावर बाहेर येताच पाचव्या दिवशी 'गेम'! पुण्यात तरूणीवर हल्ला केलेल्या आरोपीला मध्यरात्रीचं संपवलं, आधी केलेल्या गुन्ह्यामुळं गमावला जीव

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Panvel Water Shortage: पनवेलमध्ये पाण्याची भीषण टंचाई, लोकांचे हाल, घराबाहेर पिंपांच्या रांगा
Panvel Water Shortage: पनवेलमध्ये पाण्याची भीषण टंचाई, लोकांचे हाल, घराबाहेर पिंपांच्या रांगा
Kiran Bidkar: नागपूरच्या 'त्या' RTO अधिकाऱ्याला मोठा दिलासा; 'मॅट'कडून निलंबनाचे आदेश रद्द, नेमकं प्रकरण काय?
नागपूरच्या 'त्या' RTO अधिकाऱ्याला मोठा दिलासा; 'मॅट'कडून निलंबनाचे आदेश रद्द, नेमकं प्रकरण काय?
SSC Result 2026 Marathi: मोठी बातमी: दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास
SSC Result: मोठी बातमी: दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
EPFO : पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
Share Market : अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
First EVM Election: देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? वेगळ्या कारणानं निवडणूक झालेली रद्द, पराभूत उमेदवार फेरनिवडणुकीत झालेला विजयी...
देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? 99 टक्के लोक चुकीचं उत्तर देतात...
Embed widget