एक्स्प्लोर

ठोक आता शड्डू... सह्याद्रीतील विजयानंतरच्या मिरवणुकीतील 'ते' पोस्टर चर्चेत, बाळासाहेब पाटलांचा विजय साताऱ्यातील राजकारणात टर्निंग पॉईंट ठरणार?

ठोक आता शड्डू... सह्याद्रीतील विजयानंतरच्या मिरवणुकीतील 'ते' पोस्टर चर्चेत, बाळासाहेब पाटलांचा विजय साताऱ्यातील राजकारणात टर्निंग पॉईंट ठरणार

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यावेळी अधिक चर्चेत राहिली. सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पी.डी. पाटील पॅनल समोर दोन पॅनलचं आव्हान होतं. कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि उदयसिंह  पाटील- उंडाळकर यांचं स्व.यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री  परिवर्तन पॅनल आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचं यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होती. या दोन्ही पॅनलचा पराभव करत बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलनं 21-0 असा विजय मिळवला.  बाळासाहेब पाटील यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये कारखाना कार्यक्षेत्र पिंजून काढत त्यांच्या विरोधातील नरेटिव्ह खोडून काढण्यात यश मिळवल्याचं निकालातून पाहायला मिळालं. 

राज्यात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं अपयश आलं. सातारा जिल्ह्यात महायुतीनं सर्व जागा जिंकल्या. कराड उत्तरचे 5 टर्म आमदार असलेल्या बाळासाहेब पाटील यांचा देखील पराभव झाला. विधानसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब पाटील यांच्या विरोधकांच्या निशाण्यावर सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक होती.  विधानसभा निवडणुकीच्या विजयावेळीच तसे संकेत दिले गेले होते. मात्र, बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्रीवर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवलं आहे.

ठोक आता शड्डूचा किस्सा नेमका काय? 

बाळासाहेब पाटील यांनीच त्यांच्या विजयी भाषणात विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळचा एक प्रसंग सांगितला. पराभवानं कधी खचून जायचं नसतं आणि विजय मिळाला तर तो पचवण्याची ताकद पाहिजे. चव्हाण साहेबांच्या त्या विचारानं पुढं चाललो आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी वल्गना केल्या, आम्ही सह्याद्री कारखान्याची निवडणूक घेणार, आम्ही जिंकणार, नाही म्हटलं तरी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती.  सह्याद्री कारखान्यासमोरच्या पुलावरुन कारखान्याकडे बघून यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याकडं बघून शड्डू  ठोकला गेला. एक आहे 32 हजार लोकांशी लढत होती ते विसरले. कुणापुढं उन्माद वापरतोय हे त्यांच्या लक्षात आलं नाही, अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा बंदोबस्त वेळीच करणं आवश्यक आहे, असं बाळासाहेब पाटील म्हणाले होते. विरोधकांची खासगीत चर्चा काय कारखाना ताब्यात घ्यायचा, अधिकारी नेमायचे आणि पीडी साहेबांचा पुतळा इथून काढायचा... अरे तुम्हाला माहिती नाही, आम्ही दु:खात असताना सह्याद्री साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी पै पै गोळा करुन पुतळा उभा केला. कराड पालिकेसमोरील पुतळा देखील कर्मचाऱ्यांनी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी, त्यांच्या मुलांनी पैसे देऊन उभारला, असं बाळासाहेब पाटील म्हणाले. पीडी पाटील साहेबांनी कराड शहरासाठी आणि कारखान्यासाठी घातलं तुम्ही कोणत्या वल्गना करता, असं ते म्हणाले होते. 

सह्याद्रीच्या विजयानं मविआला बळ मिळणार

सातारा लोकसभा मतदारसंघात मविआचा थोडक्यात पराभव झाला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मविआला एकाही मतदारसंघात यश मिळालं नाही. मात्र, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानं मविआच्या घटकपक्षांचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र कराड, सातारा, कोरेगाव, खटाव आणि कडेगाव तालुक्यात आहे. बाळासाहेब पाटील यांनी विजयी सभेत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका ताकदीनं लढायच्या आहेत, असं जाहीर केलंय. त्यामुळं साताऱ्यातील मविआच्या घटकपक्षांचा आगामी काळात आत्मविश्वास नक्कीच वाढण्याची शक्यता आहे.  बाळासाहेब पाटील यांनी पाच टर्म आमदार म्हणून काम केलं आहे. मविआ सरकारच्या काळात ते सहकार मंत्री होते. सह्याद्रीतील बाळासाहेब पाटील यांचा विजय साताऱ्याच्या राजकारणात टर्निंग पॉईंट ठरतो का ते येणाऱ्या काळात दिसून येतं का ते पाहावं लागेल. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
Rajya Sabha Election 2026: लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
Gunratna Sadavarte : ठाकरे बंधूंसह शरद पवारांच्या नावाने बोंब, पंतप्रधान मोदी अन मुख्यमंत्री फडणवीसांचं कवितेतून कौतुक; ॲड. गुणरत्न सदावर्तेंची 'राजकीय धुळवड'
ठाकरे बंधूंसह शरद पवारांच्या नावाने बोंब, पंतप्रधान मोदी अन मुख्यमंत्री फडणवीसांचं कवितेतून कौतुक; ॲड. गुणरत्न सदावर्तेंची 'राजकीय धुळवड'
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कृषी साहित्य खरेदी आणि इतर प्रकरणात दिलासा, पोस्ट करत म्हणाले, आपल्याला न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका...
आपल्यापैकी अनेकांच्या भावनिक व अविचारी कृतीमुळं आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्या बळ मिळतं, संयम महत्त्वाचा: धनंजय मुंडे 

व्हिडीओ

America Israel Attack Iran : युद्धामुळे सोलापूरच्या द्राक्षांची आखाती देशातील बाजारपेठ बंद
America Israel Attack Iran : इस्रायलचा इराणच्या गोलेस्टन पॅलेसवरही हल्ला, 500 वर्षांपूर्वीच बांधकाम
Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
PM नरेंद्र मोदींनी फिरवला फोन, आखाती देशातील दोन बड्या नेत्यांशी चर्चा, युद्धजन्य परिस्थितीवर काय म्हणाले
PM नरेंद्र मोदींनी फिरवला फोन, आखाती देशातील दोन बड्या नेत्यांशी चर्चा, युद्धजन्य परिस्थितीवर काय म्हणाले
Team India : टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
रंग बरसे... जितेंद्र आव्हाड अन् गौतमी पाटीलची होळी; ठाण्यात सदाबहार गाण्यांवर नृत्याचा जलवा
रंग बरसे... जितेंद्र आव्हाड अन् गौतमी पाटीलची होळी; ठाण्यात सदाबहार गाण्यांवर नृत्याचा जलवा
BJP Rajya Sabha Candidate List : भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
Embed widget