मोठ्या आवाजात गाणे ऐकणे, कानाला योग्य विश्रांती न देणे, कॉटन बड्सचा वापर करणे, हेडफोन आणि इअरबड्सच्या अतिवापर यांसारख्या वाईट सवयीने श्रवणशक्ती कमी होऊ शकते.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी पाणी महत्वाचे आहे. काही लोक तहान लागल्यावरच पाणी पितात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीला नुकसान होते.
मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. सतत तणावात राहिल्याने आणि नकारात्मक विचार केल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात.
तासन् तास स्क्रीनसमोर बसून काम करत असाल तर एका तासाच्या अंतराने 30 ते 40 सेकंद डोळे बंद करून आराम करा तसेच अंधारात मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करणे टाळा.
यकृत पोषक तत्वांचा साठा करण्याबरोबरच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. फास्ट फूड खाणे आणि मद्यपान केल्याने यकृतवर विपरीत परिणाम होतो.
खूप वेळ उपाशी राहिल्याने पोटाचे आरोग्य बिघडते तसेच शिळं अन्न खाणे, अन्नाबरोबर पाणी पिणे, वेळेवर जेवण न करणे या वाईट सवयीने पोट दु:खी सारखी समस्या होते.
हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे. जास्त मीठाचे सेवन केल्याने हृदयावर विपरीत आणि हानिकारक परिणाम होतो.
धूम्रपान केल्याने फुफ्फुसांचे नुकसान होते. ग्रीन टी, हर्बल टी, टोमॅटो, हळद, भोपळा, रिकाम्या पोटी सफरचंद असे काही पदार्थ खाल्याने फुफ्फुसे निरोगी राहू शकतात.
स्वादुपिंड एखाद्याच्या पित्ताशयाच्या जवळ पोटाच्या मागे स्थित असतो. स्वादुपिंडाच्या लक्षणांमध्ये त्वचेला खाज सुटणे, कावीळ आणि पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे ही लक्षणे दिसून येतात.
फोटो काढताना पोट दिसू नये म्हणून अनेकजण श्वास खेचून पोट आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करतात असं केल्याने आतड्यावर ताण येतो. याशिवाय थंड आणि तेलकट अन्न खाल्ल्याने आतड्यांवर विपरीत परिणाम होतो.