एक्स्प्लोर
Raut vs Navnath Ban : मुंबई कुणाची? राऊत-बन यांच्यात कलगीतुरा
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बंग यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. 'भारतीय जनता पक्ष पन्नासचा नारा देईल, एकनाथ शिंदे गट शंभर वीसचा नारा देईल आणि अजित पवार किमान शंभर जागा जिंकतील, मग आम्हाला राजकारण संन्यास घेऊन केदारनाथला मोदींच्या गुफेत बसावं लागेल,' असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. यावर प्रत्युत्तर देताना, नवनाथ बंग यांनी म्हटले आहे की, मुंबई महापालिका निवडणुकीनंतर संजय राऊत यांनाच राजकीय संन्यास घेऊन हिमालयात जावे लागेल. मुंबईकर महायुतीलाच निवडून देतील आणि तुम्हालाच आघाडीसाठी इतरांकडे भीक मागावी लागत आहे, असेही बंग म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

















