Badlapur Crime Superfast News : बदलापुरात उद्रेक, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : ABP Majha
Badlapur Crime Superfast News : बदलापुरात उद्रेक, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : ABP Majha
बदलापूर अत्याचार प्रकरणातील पीडीत मुलींचा एसआयटी प्रमुख आरती सिंग यांनी नोंदवला जबाब, एसआयटी मुख्यध्यापिका, शिक्षकांचाही जबाब नोंदवणार.
बदलापूर आंदोलनाचा समाजकंटकांनी फायदा घेतल्याचा पोलिसांचा दावा. आंदोलन प्रकरणी फोन कॉल्स, व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती, एकूण ६८ जणांना अटक.अनेक आंदोलक बाहेरचे असल्याची पोलिसांची माहिती.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, १७ तारखेला आरोपीला केली होती अटक.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, किशोरी पेडणेकरांसह ठाकरे गटाच्या पदाधीकाऱ्यांनी घेतली रश्मी शुक्लांची भेट, बदलापूर घटनेची दखल घेण्याची मागणी.
लाडक्या बहिणीपेक्षा सुरक्षित बहिण योजनेची राज्याला अधिक आवश्यकता, १५ दिवसांचं सीसीटीव्ही फूटेज गायब, पोलिसांसोबतच संस्थाचालकांवरही कारवाई व्हावी, अंबादास दानवेंची मागणी.
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआकडून २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक, मविआच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत नाना पटोलेंची माहिती