एक्स्प्लोर

Ashok Chavan Vilasrao Deshmukh : विलासराव देशमुख यांची एक चूक आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले

Ashok Chavan Vilasrao Deshmukh :

राजकारणात जितकी मेहनत महत्वाची तितकचं नशीब सुद्धा...आणि हे नशीब चमकलं कोण कुठून कुठे जाईल हे सांगताही येत नाही...सध्या राज्यात चर्चा सुरु आहे ती अशोक चव्हाण यांची...आणि त्यांचंही नशीब 2008 साली असचं काहीसं चमकलं होतं...विलासराव देशमुखांनी एक चुक केली आणि अशोक चव्हाण थेट मुख्यमंत्री झाले...काय आहे किस्सा? जाणून घेऊ!

नमस्कार...
अशोक चव्हाण...सध्याच्या घडीला राज्यात ट्रेंडिंगवर असणारा नेता...जवळपास अर्धदशक काँग्रेससाठी काम केल्यानंतर चव्हाणांनी आपला प्रवाह आता बदललाय...काँग्रेसचा हात सोडत त्यांनी कमळ पकडलंय आणि थेट भाजपात गेलेत...अशोकरावांचा गाजलेला काळ म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा...ते फक्त 2 वर्ष मुख्यमंत्री होते पण आदर्श घोटाळ्यामुळे देशभरात राडा करुन गेले...पण चव्हाणांनी मुख्यमंत्रीपद अगदी नशीबानं मिळालं होतं...

गोष्ट आहे 2008 सालची...26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला..पुढे तिन दिवस ताज हॉटेस...ऑपरा हाऊस अशी मुंबईतील काही प्रमुख ठिकाणी धगधगत होती...अनेकांनी प्राण गमावले...अनेक जवान शहिद झाले...अनेक कुटुंब रस्त्यावर आली...त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते...काँग्रेसचे दिवंगत नेते...विलासराव देशमुख...

हल्ल्यानंतर विलासराव देशमुख...ताज हॉटेलमध्ये पाहणीसाठी दाखल झाले...तो पर्यंत सगळं ठिक होतं...राडा तेव्हा झाला जेव्हा...लोकांनी ताजमध्ये  विलासरावासोबंत त्यांचा मुलगा रितेश देशमुख आणि फिल्म डिरेक्टर राम गोपाल वर्मांना पाहिलं...फिल्मसाठी लागणाऱ्या रेकीसाठी ते तिथे गेले होते... त्यावेळचं वृत्त असं होतं...राम गोपाल वर्मांना 26 11 च्या हल्ल्यावर एक सिनेमा करायचा होता ज्यात ते रितेश देशमुख यांना कास्ट करणार होते... या एका घटनेवरुन विरोधकांनी काँग्रेसला घेरलं आणि टीकांचा भडीमार केला...हा मुद्दा फार Sensetive होता..त्यामुळे काँग्रेसला टीकांना उत्तर देणंही कठीण झालं...प्रकरण इतकं वाढलं की अखेर काँग्रेस हायकमांडचा आदेश आला आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाले...त्यांनी राजीनामा दिला...

हा मॅटर थंड झाला पण दुसरा मुद्दा होताच...पुढचा मुख्यमंत्री कोण? अनेक नावांची चर्चा झाली...सगळ्याचं ब्रेनस्टॉर्मिंग सुरु असताना सोनिया गांधींनी एक नाव सजेस्ट केलं...सगळ्यांनी संमत्ती दिली आणि नाव फायनल झालं...अशोक शंकरराव चव्हाण!

08 December 2008 रोजी अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाची शपध घेतली आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले...पुढे 2009 च्या निवडणुकांमध्येही काँग्रेस सरकारलं तेव्हा अशोक चव्हाणच मुख्यमंत्री राहिले...

खरं तर...
अशोकराव पहिल्यांदा मुख्यमंत्री होण्यात नशीबाचा खुप मोठा आहे...विलासरावांनी राम गोपाल वर्मांना रेकीसाठी नेण्याची चूक केली नसती तर कदाचित पुढे हे सगळं झालं नसतं...त्यांच्या एका चुकीमुळे अशोकरावांच्या पदरात मुख्यमंत्रीपद पडलं...

महाराष्ट्र व्हिडीओ

Ambadas Danve on Eknath Shinde : टँकरमध्ये पाणू कुठून टाकणार? अजित पवारासारखं आणणार का?
Ambadas Danve on Eknath Shinde : टँकरमध्ये पाणू कुठून टाकणार? अजित पवारासारखं आणणार का?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

Ujani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?Zero Hour Water Crisis : 1500 लोकसंख्येच्या गावात एकच हँडपंप, पाणी टंचाईचा प्रश्न कसा सुटेल?Zero Hour Full Water Crisis : ना पिण्याचं पाणी, ना जनावरांचा चारा; दुष्काळग्रस्त भागाला दिलासा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget