Anil Deshmukh Case : अनिल देशमुख... ईडी... अन् ड्रामा; ईडी प्रकरणात नाट्यमय घडामोडी ABP Majha
Anil Deshmukh Case : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशी प्रकरणात काल रात्री नाट्यमय घडामोडी घडल्या. अनिल देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं अपहरण करुन ताब्यात घेतल्याचा आरोप वकिलांनी केला. त्यानंतर देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं. तसेच सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक करण्यात आली. यामुळे सगळ्या प्रकरणाला एक वेगळं आणि नाट्यमय वळण मिळालं. वकिलांनी सीबीआय अधिकाऱ्याला पैसे देऊन प्राथमिक चौकशी अहवाल लीक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
रविवारी सीबीआयचा एक गोपनिय अहवाल माध्यमांपर्यंत पोहोचला. परंतु, या अहवालावर कोणतीही सही नव्हती. हा अहवाल कोणीतरी लीक केला होता. या अहवालात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सबळ पुराव्यांअभावी क्लिन चिट देत असल्याचा आशय होता. मात्र सीबीआयकडून याला कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आला नव्हता. पण तो अहवाल नेमका कुठून लीक झाला? याची चौकशी करण्यात आली. याचप्रकरणी काल संध्याकाळी अनिल देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र अनिल देशमुख यांच्या वकिलांच्या टीमपैकी एक वकिल आनंद डागा यांच्या अटकेची शक्यता आहे. मात्र अद्याप त्यांना अटक झाली की, नाही? याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.
नाट्यमयी घडामोडींमध्ये सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक करण्यात आली. यांनीच पैसे घेऊन, लाच स्विकारत हा गोपनिय अहवाल थोडेपार बदल करुन लीक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरु आहे.
![ABP Majha Headlines : 11 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/cb71838009027ec28a3dd5c8da4ee4f71739858427130976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Supriya Sule Meet Deshmukh Family : 'वरुन फोन आला तक्रार घेऊ नका मग कितीही झालं तरी दखल घेत नव्हते'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0d22c37f62020e6dbeeccf5569daddc11739857882117976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha : सकाळी 10 च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/11f2b9f450c0313743f0d3c99f483e0a1739856153351976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Santosh Deshmukh Mother:लेकराला स्वयंपाक केला,5 रिंग वाजल्या देशमुखांच्या आईचा टाहो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f8c5e5fbb2ac939549d8d22cdbf082291739854939150976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chhatrapati Sambhajinagar : हर हर महादेव, शिवजयंतीनिमित्त Ambadas Danve यांची तलवारबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/e59d7b7dbf43942e5b0fa8881c95050f1739853234226976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)