Amit Shah | शिवरायांच्या आदर्शानुसार सरकारची वाटचाल - अमित शाह
Amit Shah | 'शिवरायांच्या आदर्शानुसार सरकारची वाटचाल' |
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर अभिवादन केलं. छत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाचं अमित शाहांनी स्मरण केलं. २०० वर्षांच्या मुगलशाहीतून देशाला शिवरायांनी स्वतंत्र केलं असं अमित शाह म्हणाले. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषेच्या उद्धाराचा लढा शिवरायांनी दिला. त्याच आदर्शांवर नरेंद्र मोदी सरकारची वाटचाल सुरू आहे असं शाह म्हणाले. स्वतःला आलमगीर म्हणवणारा इथे पराजित झाला. त्याची कबर इथेच खोदली गेली, हा इतिहास आपल्या मुलांना शिकवला गेला पाहिजे असं ते म्हणाले. शिवराय हे एकट्या महाराष्ट्रापुरते मर्यादीत नाहीत, ते संपूर्ण जगासाठी आदर्शवत आहेत असं शाह म्हणाले.
कवड्याची माळ, शिंदेशाही टोपी आणि शाल घालून अमित शाहांचं किल्ले रायगडावर स्वागत, मंत्री भरत गोगावलेंकडून किल्ले रायगडाची प्रतिकृती शाहांना भेट.




















