एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akluj आणि Natepute ग्रामपंचायतीचे नगरपरिषद, नगरपंचायतीत रुपांतर; ग्रामस्थांकडून एकच जल्लोष ABP Majha
गेल्या 43 दिवसांपासून अकलूज-माळेवाङी व नातेपुते नागरीकांच्या सुरु असलेल्या लढ्याला आज यश मिळाले. शासनाने दिलेल्या मुदतीला चार दिवस बाकि असताना आज नगर विकास खात्याने अकलूज-माळेवाङी नगर परिषद व नातेपुते नगर पंचायत गठीत केल्याचा आदेश काढला असून यावर जनतेच्या एकीचा विजय झाला आहे. गेल्या 22 जून पासून अकलूज येथिल प्रांत कार्यालयासमोर तीनही गावच्या नागरीकांनी नगर परिषद व नगर पंचायतीची मंजूरी मिळेपर्यंत उपोषण सुरु केले होते.
या उपोषणाला चिञा वाघ, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. राम सातपुते, आ. प्रशांत परिचारक, यांनी पाठींबा दिला होता. माजी उपमुख्यमंञी विजयसिंह मोहीते पाटील, आमदार रणजितसिंह मोहीते पाटील आणि धैर्यशील मोहीते पाटील, उपसरपंच शिवतेजसिंह मोहीते पाटील, माळेवाङी, नातेपुतेचे सरपंच, उपसरपंच, बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे व इतर नागरीकांचे शिष्टमंङळ नगर विकास मंञी एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना जाऊन भेटले होते. तत्पुर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उपोषण व आंदोलन काळात यावर दोनदा सुनावणी झाली. पहिल्या सुनावनीत शासनाने आपली बाजु मांङली नसल्याने त्यांना न्यायालयाने बाजू मांङण्याचा आदेश दिला, दुसऱ्या सुनावणीत शासनाने तीन आठवङ्यांचा वेळ मागुन घेतला.
उपोषण काळात शासनाचा दहावा घालण्यात आला. जागरण गोंधळ करण्यात आला. उपोषणास तालुक्यातील सुमारे १६५ संघटनांनी पाठींबा दिला. गेल्या ४३ दिवसांमध्ये सुमारे दहा हजार वीस लोकांनी आंदोलनात भाग घेतला. शिवसेना, भाजपा व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी या आंदोलनाला आपला पाठींबा दिला होता . शासनाच्या निर्णयानंतर अकलूज मध्ये फटाक्यांची अतिषाबजी करून शहरात मिठाई वाटण्यात आली. फटाके फोङण्यात आले. व ङीजेच्या तालावर नाचुन नागरीकांनी आपला आनंद व्यक्त केला.
महाराष्ट्र
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 6:30 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Ajit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement