Ajit Pawar Full PC : विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेद्वार कोण आहे तो सांगा ? - अजित पवार
Ajit Pawar Full PC : विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेद्वार कोण आहे तो सांगा ? - अजित पवार
कोरोनाचा (Coronavirus Updates) नवा व्हेरियंट धोकादायक नाही, त्याची तीव्रता कमी आहे, घाबरुन जाऊ नका, काळजी घ्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. तसेच, पुण्यात (Pune News) पाणी टंचाई जाणवणार नाही, पाण्याचं योग्य नियोजन करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्यासोबतच माझ्यासोबत ज्यांना यायचं आहे, त्यांनी यावं, पक्षासाठी जे योग्य असेल ते माझ्यासोबत राहून करा, दोन्ही बाजूला राहू नका, एवढंच सांगायचं आहे, असंही अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "पाणी सर्वात आधी पिण्यासाठी राखीव ठेवा, मग शेतीसाठी वापरा. जुलैपर्यंत पाणी पुरेल असं पाण्याचं नियोजन करायचं आहे. गेल्या वर्षीच्या तुनेत पुण्यातील पाण्याची परिस्थिती बिकट आहे. संपुर्ण राज्यात पाण्याचा साठा कमी आहे." पुढे बोलताना एबीपी माझा आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, "सर्वेला काहीच आधार नसतो. विधानसभेच्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे सर्वे तुम्ही आठवा आणि निकाल काय लागले तेसुद्धा आठवा. तुम्ही किती लोकांना विचारता आणि कुठल्या भागात सर्वे करता, यावर सर्वेचे निकाल अवलंबून असतात. त्यांनी सर्वे केलेला असला, तरी आमची तीन पक्षांची युती आहे. अजुन आमच्या हातात काही काळ आहे, त्यात आम्ही कुठे आणि कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल असं काम करू."