Ajay Baraskar Full PC :कॉल रेकॉर्डींग ऐकवत मनोज जरांगेंची केली पोलखोल;अजय बारसकरांची पत्रकार परिषद
Ajay Baraskar Full PC :कॉल रेकॉर्डींग ऐकवत मनोज जरांगेंची केली पोलखोल;अजय बारसकरांची पत्रकार परिषद
गेल्या सहा महिन्यांपासून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधूनच मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर 54 लाख कुणबी सापडल्या होत्या, त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि सगसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी केली होती. मात्र, या सर्व मागण्या राज्य सरकारकडून बाजूला ठेवण्यात आल्या आणि स्वतंत्र 10 टक्के आरक्षणाची घोषणा एकदिवसीय विशेष अधिवेशनातून करण्यात आली.
यानंतर जरांगे पाटील पुन्हा आपल्या मुळ मागण्यांवर कायम असून त्यांनी उपोषण सुरु केलं आहे. त्याचबरोबर राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. आता दुसरीकडे, त्यांच्यासोबत काम केलेल्या माजी सहकाऱ्यांकडून आरोपांवर आरोप केले जात आहेत. यामध्ये अजय बारसकर सुद्धा आघाडीवर आहेत. बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करत आरोपांच्या पिंजरात उभा केलं आहे.