ABP Majha Marathi News Headlines 5PM Top Headlines 5PM 07 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 5PM Top Headlines 5PM 07 April 2025
घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागला..उज्ज्वला योजनेतील सिलेंडर आता ५५० रुपयांवर...तर बिगर उज्ज्वला योजना सिलेंडर ८५३ रुपयांवर..
पेट्रोल आणि डिझेल महागणार नाही, केंद्रानं केेलेली उत्पादन शुल्कातील प्रतिलिटर २ रुपयांची वाढ पेट्रोलियम कंपन्या सोसणार, ग्राहकांवर भार पडणार नाही.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा, हॉस्पिटलची बदनामी थांबवण्यासाठी राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरण,
तनिषा भिसे यांचा नुसता मृत्यु नाही तर हत्या, सुप्रिया सुळेंची भिसे कुटुंबीयांना भेटल्यानंतर प्रतिक्रिया, घैसासांनी राजीनामा देऊन प्रश्न सुटत नसल्याचं वक्तव्य..
तनिषा भिसेंवर योग्य वेळी उपचार न करणारं दीनानाथ रुग्णालय दोषी, आरोग्य उपसंचालकांचा चौकशीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा ठपका
गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी माता अन्वेषण समिती, धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा, तिन्ही अहवालांचे निष्कर्ष पाहून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय
अक्षय शिंदे एनकाऊंटरप्रकरणातील दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश..डीसीपींच्या अध्यक्षतेखाली विशेष एसआयटी स्थापन करावी आणि क्राइमच्या सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांनी नजर ठेवण्याची सूचना..





















