ABP Majha Headlines : 08 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
काँग्रेसची नीती शेतकरी आणि गरीब विरोधी, पंतप्रधान मोदींचा वर्ध्यातून हल्लाबोल, संविधान गुंडाळून आणीबाणी लावण्याची मानसिकता गेली नाही, मोदींची टीका
लोकसभा निवडणुकीसाठी देशात १०२ तर राज्यात ५ मतदारसंघात मतदान, राज्यात सहा वाजेपर्यंत अंदाजे ५५ टक्के तर देशात अंदाजे 60 टक्के मतदान
नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार.. तर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, भुजबळांची प्रतिक्रिया.
नाशिक लोकसभेसाठी शिवसेनेतच दोन गट, विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या नावाची चर्चा, तर शिंदे गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते लोकसभेसाठी इच्छुक
नाशिकनंतर ठाणे लोकसभेकडे सर्वांचं लक्ष, ठाण्यासाठी भाजप आमदार रवींद्र फाटक इच्छुक तर शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांच्या नावाची चर्चा
अनुसुचित जमातीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला.
बारामतीत कन्हेरी येथील मारुती मंदिरात सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ वाढवला.. सुप्रिया सुळेंच्या प्रचारात संपूर्ण पवार कुटुंबिय उपस्थित
अजित पवारांनी धाराशिवच्या हजरत गाजी शमशोद्दीन दर्ग्यामध्ये घेतलं दर्शन, महायुतीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटीलही उपस्थित