ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 06 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स
महाराष्ट्रासाठी गुड न्यूज, मान्सूनचं तळकोकणात आगमन, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाच्या सरी
मुंबईतील पवईत महापालिका पथक आणि पोलिसांवर दगडफेक, अतिक्रमणाची कारवाई सुरु असताना जमावाचा हल्ला, १५ ते २० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी
राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीसांची अमित शाहांशी फोनवर चर्चा, प्रत्यक्ष भेटून बोलू, शाहांचा फडणवीसांना निरोप, आज नागपूरमार्गे दिल्लीला जाणार
राज्यातलं चित्र बदलण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी, देवगिरी बंगल्यावरील राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांचा सूर, तटकरेंनी मात्र वृत्त फेटाळलं
सुनेत्रा पवारांबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर, पार्थ आणि जय पवार मलाही मुलांसारखेच, पुण्यात जंगी स्वागत झाल्यावर सुप्रिया सुळेंची भावनिक प्रतिक्रिया
((सुनेत्रा वहिनींबद्दल नेहमीच आदर-सुप्रिया))
बारामती कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदावरून युगेंद्र पवारांना हटवलं, आपल्याला न कळवता पदावरून हटवल्याचा युगेंद्र पवारांचा दावा.
लोकसभेच्या निकालानंतर बैठकांचं सत्र, शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक, तर शिवसेनेला एक कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता.
बारामतीतल्या विजयानंतर सुप्रिया सुळेंचं पुण्यात जंगी स्वागत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन
संघाचं नेतृत्व मोदींना पर्याय शोधतंय, संजय राऊतांचा दावा, भाजपमध्ये मोदींबाबत प्रचंड नाराजी असल्याची राऊतांची टीका
अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करा, जेडीयूची मागणी, अग्निवीर योजनेविरोधात बिहार, यूपीत प्रचंड असंतोष
लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावर राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, लवकरच अधिकृत घोषणा, संजय राऊतांचं अनुमोदन
अपक्ष विशाल पाटील आणि विश्वजीत कदम काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहणार, उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार, विशाल पाटील मुंबईकडे रवाना
बळवंत वानखडेंच्या मिरवणुकीत नवनीत राणांवर आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा आरोप, भाजपच्या शिष्टमंडळाकडून पोलीस आयुक्तांची भेट, शेरेबाजी करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी