ABP Majha Headlines 6.30 AM : 05 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines 6.30 AM : 05 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पुण्याच्या धानोरीत काही मिनिटांच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं, दुकानांत पाणी शिरल्यानं नुकसान.
प्रणिती शिंदेंच्या विजयानंतर माजी आमदार नरसाय्या आडम यांचा जल्लोष, लोकसभा निवडणुकीत माकप आमदार नरसय्या आडम यांनी काँग्रेसला दिला होता पाठिंबा
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी, पावसाचं पाणी घरात शिरल्यानं घरातील साहित्याचं मोठं नुकसान.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीला जाणार, इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंच्या विजयानंतर राणे कुटुंबाला अश्रू अनावर, नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे, निलम राणे हजारो कार्यकर्त्यांसमोर भावूक.
ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे आणि निलेश लंकेंच्या विजयानंतर बाळासाहेब थोरातांचा जल्लोष, संगमनेर शहरात गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा.
साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या विजयानंतर जल्लोष, हजारो कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण.