एक्स्प्लोर
Rohit Sharma: रोहित शर्मा दुसऱ्यांदा 'बाबा' होणार?; ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकण्याची शक्यता, BCCI ला सांगितलं कारण
Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
Rohit Sharma-Ritika Sajdeh
1/9

एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमधील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Photo Credit-Rohit Sharma)
2/9

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून माघार घेण्याची शक्यता आहे. (Photo Credit-Rohit Sharma)
3/9

वैयक्तिक कारण असल्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या सामन्यातून माघार घेणार असल्याचं रोहित शर्माने बीसीसीआयला कळवल्याची माहिती देखील समोर आली आहे. (Photo Credit-Rohit Sharma)
4/9

मालिका सुरू होण्याआधी वैयक्तिक बाब निकाली निघाल्यास रोहित शर्मा सर्व सामने खेळू शकेल, असंही बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले आहे.(Photo Credit-Rohit Sharma)
5/9

दरम्यान रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचं बोललं जात आहे. (Photo Credit-Rohit Sharma)
6/9

पत्नी रितिका सजदेह प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.(Photo Credit-Rohit Sharma)
7/9

रोहितची पत्नी रितिका हिने डिसेंबर 2018 मध्ये एका मुलीला जन्म दिला. रोहितच्या मुलीचे नाव समायरा आहे.(Photo Credit-Rohit Sharma)
8/9

रोहित शर्मा सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 ऑक्टोबरपासून खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. यासाठी ते खूप मेहनत घेत आहेत.(Photo Credit-Rohit Sharma)
9/9

रोहित आणि रितिका यांचे 2015 मध्ये लग्न झाले होते. रोहितने रितिकाला बरेच दिवस डेट केले होते. रितिका याआधी रोहितची मॅनेजर होती.(Photo Credit-Rohit Sharma)
Published at : 11 Oct 2024 07:34 AM (IST)
आणखी पाहा























