(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM : 31 July 2024 : Maharashtra News
अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली, राज ठाकरेंवरील टीकेमुळे मनसैनिक आक्रमक, हल्ला राज ठाकरेंच्या आदेशावरुनच, मिटकरींचा आरोप
अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्लाप्रकरणातील आरोपी जय मालोकार यांचा हृदयविकारानं मृत्यू, राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात केलेलं दाखल
कुणबी दाखले शोधासंदर्भात स्थापन केलेल्या शिंदे समितीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, उर्वरित दस्तावेज जमा करणार
मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नाहीच, मोदींनीच तोडगा काढावा, पाठिंबा देऊ, उद्धव ठाकरेंकडून आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात, तर शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार
मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील आज धडकणार अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत करणार विचारणा
मातोश्रीवरील मराठा आंदोलनामागे भाजपचा हात असल्याचा आरोप, भाजपचे पदाधिकारी सुशील पायाळ आंदोलनामध्ये, माझाने प्रश्न विचारताच पायाळ यांनी काढला पळ
राज्यात ८१ हजार कोटींच्या गुंतवणुकीला मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी, मराठवाडा आणि विदर्भात मेगा प्रकल्प उभारणार
पूजा खेडकर प्रकरणी 'वायसीएम'च्या डॉक्टरांना क्लीन चिट, सूत्रांची माहिती, 'वायसीएम'चे राजेश वाबळेंकडून चौकशीचा सुधारित अहवाल सादर