ABP Majha Headlines : 1:00 PM : 19 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 1:00 PM : 19 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार.
मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक विधान
कोणत्याही पक्षात जाणार नाही, कोणत्याही नेत्याला भेटलो नाही, नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांची एबीपी माझाला EXCLUSIVE प्रतिक्रिया...
२०० हून अधिक विधानसभेच्या जागा लढण्याची घोषणा केल्यावर राज ठाकरेंचा पहिलाच नाशिक दौरा, उद्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखीतही सहभागी होणार
राज्यात भाजप काढणार धन्यवाद यात्रा, लोकसभा निकालांनंतर मतदारांचे मानणार आभार
दिल्लीतून नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्यावर फडणवीस अॅक्शन मोडवर, आज तातडीने बोलावल्या दोन बैठका, विकास प्रकल्पांचा घेणार आढावा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड भेट घेणार, प्रकाश आंबेडकरही उद्या भेट घेणार
लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर जरांगेंची टीका, आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप