(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 10 AM : 21 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल यांच्यासह दोन जणांना संभाजीनगरमधून अटक
अग्रवालांच्या मुजोरीचा नवा पुरावा, दोन पुणेकरांचा जीव घेणारी पोर्शे कार नोंदणीशिवायच रस्त्यावर, पुणे आरटीओच्या माहितीनंतर पितळ उघडं
पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात...राज्यात ५४.३३ टक्के तर संथ मतदानावरुन उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये आरोपांची राळ
खासदार श्रीकांत शिंदेंच्या कल्याण मतदारसंघात सर्वात कमी मतदान तर दिंडोरीत सर्वाधिक ५७.०६ टक्के मतदान, कमी मतदानाचा कोणाला फटका, कोणाला फायदा यासाठी निकालाची प्रतीक्षा
बारावीच्या 15 लाख विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी २४ मेपासून नोंदणीला सुरुवात, प्रवेशासाठी यंदा तीन नियमित तर दोन विशेष फेऱ्या
नागपुरात जातीचे खोटे दाखले बनवून नामांकित शाळांमध्ये प्रवेश, आरटीई अन्वये प्रवेश घेणाऱ्या १९ पालकांविरोधात गुन्हा दाखल
आचारसंहितेचे नियम शिथिल करुन चारा उपलब्ध करुन द्या, अंबादास दानवेंची मागणी, तर अनेक जिल्ह्यात ४५ दिवस पुरेल एवढा चारा, मंत्री विखे पाटलांचा दावा
ऑनलाईन गेमच्या व्यसनातूनच सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची आत्महत्या, आमदार बच्चू कडू यांचा आरोप, सचिनने भारतरत्न परत द्यावा अन्यथा घरासमोर पुतळा जाऊन आंदोलन करण्याचा कडूंचा इशारा
आयपीएल प्लेऑफच्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद भिडणार, विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार