ABP Majha Headlines : 02 PM : 20 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मविआच्या जागांच्या तिढ्यावरून मातोश्रीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक.. शरद पवारांना भेटून आल्यानंतर आदित्य ठाकरेही सहभागी... स्बबळाचा नारा की काँग्रेसवर दबावाचं तंत्र..
नाना पटोले, विजय वडेट्टीवारांसह थोरातांची आज दिल्लीवारी... जागावाटपासंदर्भात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची चर्चा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज पुन्हा बैठक, काल ५८ नावं फायनल, आणखी २६ नावांवर होणार चर्चा...
फडणवीसांनी मराठा समाजाला दिलंच काय, जरांगेंचा पुन्हा सवाल...फडणवीस जगातला सर्वात क्रूर माणूस...जरांगेंचा हल्लाबोल...
कुडाळ-मालवणमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक निलेश राणेंनी 'वर्षा'वर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट... लवकरच शिवसेनेच प्रवेश करून, होऊ शकते निलेश राणेंच्या उमेदवारीची घोषणा...
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या एका गटाकडून नवनीत राणांचं नाव पुढे... पक्ष श्रेष्ठींनी होकार दर्शवल्यास रवींद्र चव्हाण आणि इम्तियाज जलील यांचं असणार आव्हान..
चंद्रपूरच्या राजुऱ्यात सहा हजार बनावट नावं मतदार यादीत घुसवण्याचा प्रयत्न उघडकीस, तर तुळजापुरात बोगस मतदार नोंदणीप्रकरणी ४० जणांवर गुन्हा, राऊतांचे बोगस मतदार नोंदणीवरुन भाजपवर बोट