ABP Majha Headlines 11PM 15 Sep 2024 Maharashtra News
ABP Majha Headlines 11PM 15 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
मुख्यमंत्रिपदाचं मला स्वप्न पडत नाही, सीएमचा चेहरा जाहीर करा म्हणणाऱ्या ठाकरेंचं शिर्डीत वक्तव्य, तर ठाकरेच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, राऊतांचा पुनरुच्चार
विरोधकांनी दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर धुडकावली, गडकरींचा गौप्यस्फोट, भूमिकेशी तडजोड न करणारे गडकरी पंतप्रधान हवेत, अनेक विरोधकांची भूमिका
धनगड आणि धनगर एकच आहेत असा जीआर काढण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर शंभूराज देसाईंची माहिती, तर उपोषण मागे घेण्याचं शिष्टमंडळाचं आश्वासन
लालबागच्या राजाची चरण स्पर्शाची रांग उद्या सकाळी सहा वाजल्यापासून बंद, तसेच मूखदर्शनाची रांग उद्या रात्री १२ नंतर बंद
मुंबईत गणेश मूर्ती विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव,१२ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात करणार, वाहतुकीतही बदल
चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, असं म्हणणारे उद्धव ठाकरे एक पाऊल मागे आल्याचं दिसतंय... कारण त्यांनी नुकतंच केलेलं वक्तव्य... मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पडत नसल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय... असं असलं तरी याच कार्यक्रमात आणि याच स्टेजवर संजय राऊतांनी मात्र नवी गुगली सोडलीय... पाहूयात... नेमकं काय झालंय?