Thane Public Reaction on Election : ठाण्यात शिंदेंना मनसे महागात पडणार? जनतेची बेधडक उत्तरं
Thane Public Reaction on Election : ठाण्यात शिंदेंना मनसे महागात पडणार? जनतेची बेधडक उत्तरं
हेही वाचा :
राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 65.11 टक्के मतदानाची नोंद झाली असून सर्वाधिक मतदान कोल्हापुरात, तर मुंबईत सर्वात कमी 52.07 टक्के मतदान झालं आहे. मनसेने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी 'एकला चलो रे'चा नारा दिला. मनसेचे राज्यात 128 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले. वेगवेगळ्या संस्थांने केलेले एक्झिट पोलच्या अंदाजानूसार मनसेला यंदाच्या निवडणुकीत देखील अपयश मिळताना दिसत आहे. मात्र 2019 च्या तुलनेत मनसेला यश मिळताना दिसत आहे. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचा एक उमेदवार (राजू पाटील) निवडून आला होता. पंरतु 2024 च्या दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनूसार मनसेला 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज असून 23 नोव्हेंबरलाच निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे. (Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024) दैनिक भास्करच्या एक्झिट पोलच्या अंदाजानूसार मनसेला 2 ते 4 जागा मिळण्याची शक्यता- दैनिक भास्करच्या एक्झिट पोलच्या अंदाजानूसार महायुतीला 125-140 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 135-150 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मनसेला 2 ते 4 जागा मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विविध संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानूसार राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे एक-एक जागा महत्वाची असणार आहे. मनसेला 2 ते 4 जागा मिळाल्यास राज ठाकरे भाजपला पाठिंबा देत महायुतीला साथ देण्याची शक्यता आहे. मनसेने जिंकलेल्या दोन ते चार जागा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.