Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
Rajesh Kshirsagar : बावड्यात झालेल्या वादानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी मी प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवतो, असे म्हणत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते.
कोल्हापूर : मतदानादिवशी दोनवेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. आज (21 नोव्हेंबर) एबीपी माझाशी बोलताना क्षीरसागर यांनी आरोप केला. हा राजेश क्षीरसागर षंढ नाही, निवडणूक असल्याने आम्ही संयम ठेवला. मात्र, हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? या वक्तव्यावर आमचा आक्षेप असून निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.
बावड्यात झालेल्या वादानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी मी प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवतो, असे म्हणत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. यानंतर आता क्षीरसागर यांनी त्याच वक्तव्याचा दाखला देत सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
लाडक्या बहिणीने मला भरभरून आशीर्वाद दिले
राजेश क्षीरसागर म्हणाले की, मतदानाच्या दुसऱ्या दिवसापासूनच मी नेहमी कामाला लागत असतो. त्यामुळे कामात कुठलाही खंड पडलेला नाही. लाडक्या बहिणीने मला भरभरून आशीर्वाद दिले आहेत त्यामुळे माझा विजय नक्की असल्याचा दावा क्षीरसागर यांनी केला आहे. काल झालेल्या वादाच्या प्रसंगांवरून क्षीरसागर यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 5 टक्के मतदान वाढलं आहे, महिलांनी मतदान केलं आहे. त्यामुळे काय करु आणि काय नको अशी अवस्था त्यांची झाली आहे. त्यामुळे चलबिचल झाले आहेत, अशी टीका क्षीरसागर यांनी केली.
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय?
राजेश क्षीरसागर म्हणाले की, मतदानासंदर्भात तक्रारी आल्यानंतर मी टाकाळा परिसरात संबंधित नागरिकांच्या भेट देण्यासाठी गेलो होतो. यावेळी भेट देऊन त्यांची समजूत घालून बाहेर पडल्यानंतर गुंड शुटिंग करत होते. यावेळी 22 ते 25 गुंड होते, त्यांच्या हातामध्ये दांडकी सुद्धा होती. मला वाय प्लस सुरक्षा आहे, पण मी काल नाकारली होती. माझ्यासोबत एक स्टाफ होता, त्यांनी मला कसबंस वाचवलं, मात्र माझ्या अंगरक्षकाला लागलं आहे. तरीही आमची बदनामी केली.
पूर्वनियोजित हल्ला केला गेला
त्यांनी सांगितले की, या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आणि पोलिसांकडे तक्रार आहे. अंगरक्षक सुद्धा तक्रार करणार आहे. यानंतर दुसरी घटना बावड्यात घडली. त्यांनी सांगितले की, उबाठाचा कार्यकर्ता बावड्यात आमच्या सुनील जाधवांना गद्दार बोलला, त्यावेळी गळपट धरण्यात आली. बावड्यात मिसळ खायला बसल्यानंतर पूर्वनियोजित हल्ला केला गेला. त्यावेळी सुनील जाधवांना आमच्याकडे द्या म्हणत होते. मात्र, सुनील जाधवांना हात लावणे माझ्या अंगाला हात लावल्यासारखं असल्याचे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या