एक्स्प्लोर
NDA Cadet Pune : पुण्यात NDA प्रशिक्षणार्थी कॅडेटने संपवले जीवन, एकच खळबळ
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (National Defence Academy) प्रशिक्षण घेत असलेल्या अंतरिक्ष कुमार (Antariksh Kumar) या १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याने आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊचा रहिवासी असलेला अंतरिक्ष जुलै महिन्यातच NDA मध्ये दाखल झाला होता. आज पहाटे त्याने वसतिगृहातील खोलीत बेडशीटच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे NDA परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. उत्तमनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, मानसिक तणाव, शैक्षणिक दबाव किंवा इतर वैयक्तिक कारणे होती का, या दिशेने चौकशी सुरू आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
















