Live Russia-Ukraine crisis : अमेरिका आणि रशिया दोन्ही देशांनी मागितलेली भारताची साथ : ABP Majha
युक्रेनविरोधात रशियाने पुकारलेले युद्ध थांबवण्यासाठी आणि रशियन सैन्याला माघारी बोलावण्याच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मध्यरात्री मतदान पार पडलं. यावेळी भारत आणि चीननं पुन्हा एकदा तटस्थ भूमिका घेतलीय. भारताने मतदान केलं नसलं तरी हिंसेचा भारताने विरोध केलाय. युक्रेनमधील परिस्थितीमुळे चिंतेत असल्याचे भारताने म्हटलंय. युद्ध कोणत्याही समस्येवर तोडगा नाही, त्यामुळे हिंसाचार थांबावा तसंच शत्रुत्व तात्काळ दूर व्हावं यासाठी प्रयत्न केले जावेत असंही भारताने नमूद केलंय. या प्रस्तावावर १५ पैकी ११ देशांनी मतदान केलं नाही. अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी भारताकडे मदत मागितली होती. मात्र भारताने तटस्थ भूमिका घेतल्याने अमेरिका नाराज होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नाटोकडूनंही युक्रेनला थेट लष्करी मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धात युक्रेन सध्या एकटं पडल्याचं पाहायला मिळतंय.
![Raj Thackeray on Mahesh Manjrekar : राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांच्या 'सुखा सुखी' हॉटेलला दिली भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/a4753e7fe32162bced4a70c0c6e9f5131739611473200976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Karuna Munde On Dhananjay Munde : दिशाभूल करायची आणि वाद पेटवायचा, ही त्यांची योजना- करुणा मुंडे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/4321710a469f8ece59a129c825007c731739610260696976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 15 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/ec4a51796a1e196aaf08aace995396481739609198641976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Massajog Citizen On Suresh Dhas : सुरेश धस- धनंजय मुंडे भेट, मस्साजोगच्या नागरिकांचा संताप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/6a72b513aa2757de7ec73d0e7033ff221739604083571976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut PC : सुरेश धस, मुंडे आणि कराड एकच! देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/6fd709b706f277bb2285b9101123a6f11739600517064976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)