Kolhapur : कोल्हापुरात शिवसेनेचं अनोखं आंदोलन; शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याने महापूजा घालून निषेध
Kolhapur : कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे अनोखे आंदोलन. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली... मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार जमा झाले नाहीत...याच्या निषेधार्थ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने महापूजा घालून निषेध करण्यात येत आहे...शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ अनुदान जमा करण्याची सुबुद्धी मिळो याच्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी म्हटलं आहे...तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 72 हजार शेतकरी या अनुदासाठी पात्र होणार आहेत...याची अंदाजे रक्कम 550 कोटीपर्यंत जाईल असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे...























