एक्स्प्लोर
Kolhapur :अंबाबाईच्या सौंदर्याला धक्का, चुकीच्या पद्धतीने मुर्तीचं संवर्धन केल्याचा आरोप :ABP Majha
गेल्या अनेक वर्षांपासून अंबाबाईच्या मूर्तीवर पुरातत्व खात्याकडून रासायनिक प्रक्रिया करून मूर्ती संवर्धन करण्याचं काम सुरू आहे. पण ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं होत असल्याची शंका निर्माण झालीय. कारण मूर्तीची अवस्था अत्यंत नाजूक झाली असून, मूर्ती संवर्धनाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. मूर्तीचे पाय, कंबर, हात आणि अलंकारांची झीज झाली आहे. तसंच चेहऱ्यावरच्या हावभावांतही बदल झाल्याचं मत अभ्यासकांनी मांडलं आहे. याआधी देवीच्या मूर्तीच्या ओठांना झालेल्या दुखापतीवर संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. नुकताच मूर्तीच्या डाव्या कानाकडील भागही निखळला होता.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
सोलापूर
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























