Manoj Jarange on Raj Thackeray : राज ठाकरेंसह काय चर्चा झाली? मनोज जरांगेंनी सगळं सांगितलं
जालना येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भेट दिली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, "राजकारण्यांच्या नादी लागू नका हे मी आधीच सांगितले आहे. कायदेशीर बाजू देखील समजून घेतल्या पाहिजे. जालना येथील घटनेत पोलिसांना दोष देऊ नका, कारण त्यांना आदेश देणारे दोषी आहेत. सत्तेत नसतांना मोर्चे काढतात आणि सत्तेत आल्यावर गोळ्या झाडल्या जात आहे. फडणवीस म्हणतात राजकारण करू नका, पण फडणवीस विरोधात असते तर त्यांनी काय केले असते? मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितले होते. मला या नेत्यांप्रमाणे खोटे बोलता येणार नाही. मी मुख्यंमत्री यांची भेट घेणार आहे," असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.






















