(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uttarkashi Tunnel Rescue Operation : उत्तरकाशीमधील बोगद्यातून कुठल्याही क्षणी 41 कामगारांची सुटका
Uttarkashi Tunnel Rescue Operation : उत्तरकाशीमधील बोगद्यातून कुठल्याही क्षणी 41 कामगारांची सुटका
उत्तरकाशीमधील बोगद्याचं खोदकाम जवळपास पूर्ण, अडकलेले 41 कामगार कुठल्याही क्षणी बाहेर येणार, बांधकाम ठिकाणी रुग्णवाहिकांचा ताफा सज्ज
Uttarkashi Tunnel Rescue Operation Highlights : उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातील उत्तरकाशीमधील (Uttarkashi) सिलक्यारा येथील निर्माणाधीन बोगद्यात मागील 17 दिवसांपासून सुरू असलेली बचाव मोहिमेला (Uttarkashi Tunnel Rescue Operation) काही वेळेतच यश मिळण्याची चिन्हे आहेत. या बोगद्यातून 41 मजूरांना बाहेर काढण्यात आले आहे. या मजुरांच्या सुटकेसाठी विविध यंत्रणा, लष्कराचे जवान प्रयत्न करत होते. मोठ्या मशिन्सही मागवण्यात आल्या होत्या. अखेर 17 दिवसांनी या बचाव मोहिमेला यश मिळताना दिसत आहे. 17 दिवसांपूर्वी नेमंक काय घडलं? या 17 दिवसातील घटनाक्रम काय? त्यावर एक नजर...सिलक्यारा येथील बोगद्याचे बांधकाम करण्यासाठी नेहमीप्रमाणे मजूर गेले होते. सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास अचानक भूस्खलन होण्यास सुरुवात झाली. या दरम्यान काही मजुरांना बाहेर काढण्यात आले. मात्र, निर्माणाधीन बोगद्याचा 60 मीटरचा भाग कोसळला आणि 41 मजूर अडकले.