State Covid Update : देशातल्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालय सतर्क
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून चार दिवसांत कोरोना मृत्यूंचे प्रमाण सरासरी 200 टक्क्यांनी वाढले आहे. 1 एप्रिल रोजी 5 रुग्ण दगावले होते, तर ही संख्या 4 एप्रिल रोजी 15 वर पोहचली आहे. त्याचवेळी रुग्णवाढही चिंतेत भर टाकणारी असून गेल्या 24 तासांत देशात 4 हजार 435 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सहा महिन्यांनंतर प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्येने चार हजारचा टप्पा ओलांडला आहे. आकडेवारी पाहिल्यास केवळ चार दिवसांत कोरोना मृत्यूंचे प्रमाण 200 टक्क्यांनी वाढले आहे. यादरम्यान 40 रुग्ण दगावले आहेत. 1 एप्रिल रोजी 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता, 2 एप्रिलला 11, 3 एप्रिलला 9 तर 4 एप्रिलला 15 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. मृतांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील प्रत्येकी चार जणांचा समावेश आहे.




















