एक्स्प्लोर
Delhi : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची सुनावणी 10 दिवस चालली, निकाल कधी व कोणत्या मुद्द्यावर येणार?
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात घटनात्मक पीठासमोर सुरू असलेले युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. सलग दहा दिवस देशाच्या सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरून सुरु युक्तिवाद होते. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यांना आरक्षणाचे अधिकार आहेत की नाहीत, 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेबाबत इंद्रा साहनीसह आणि निकालाचे पुनर्विलोकन आवश्यक आहे की नाही, याबाबत युक्तिवाद करण्यात आले. आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक पीठाने निकालाची तारीख राखून ठेवली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील अशा मराठा आरक्षण प्रकरणाच्या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे.
आणखी पाहा























