Sensex Sharemarket : भारतासह जगभरातल्या शेअर बाजारात पडझड
Sensex Sharemarket : भारतासह जगभरातल्या शेअर बाजारात पडझड
भारतासह जगभरतील शेअर बाजारात मोठी (Stock Market Crash)पडझड झाली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य स्थितीमुळे ही घसरण झाली आहे. चीन, अमेरिका अशा प्रमुख देशांचे निर्देशांकही घसरले आहेत. भारतीय शेअर बाजारावरही त्याचा परिणआम झाला आहे. दरम्यान, या अचानक घसरणीचे नेमके कारण काय? ही पडझड आगामी काळातही अशीच चालू राहणार का? गुंतवणूकदारांनी नेमकी काय भूमिका घ्यावी? असे विचारले जात आहे. याविषय शेअर बाजारातील तज्ज्ञ अजित फडणीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
जगभरातील शेअर बाजार पडले
जपानमध्येही शेअर बाजारात घसरण झाली आहे. जपानमध्ये गेल्या 35 वर्षांतील ही सर्वाधिक मोठी पडझड आहे. जपानमधील शेअर बाजार घसरणीचे हे प्रमाण आठ टक्के आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीमुळे ही स्थिती उभी ठाकली आहे. भारतीय शेअर बाजारीतील सेन्सेक्स साधारण 1400 तर निफ्टी 300 अंकांनी पडल्याचं पाहायला मिळालं.