(Source: ECI/ABP News/ABP Majha)
South Africa vs Netherlands : अफगाणिस्तानपाठोपाठ आज नेदरलँड्सनं विश्वचषकात एका सनसनाटी निकालाची नोंद
अफगाणिस्तानपाठोपाठ आज नेदरलँड्सनं विश्वचषकात एका सनसनाटी निकालाची नोंद केली. अफगाणिस्ताननं रविवारच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा ६९ धावांनी धक्कादायक पराभव केला होता. त्यानंतर आता नेदरलँड्सनं दक्षिण आफ्रिकेवर ३८ धावांनी मात केली. या सामन्यात नेदरलँड्सनं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ४३ षटकांत २४६ धावांचं आव्हान दिलं होतं. पण नेदरलँड्सच्या प्रभावी आक्रमणासमोर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा डाव ४३व्या षटकांत अवघ्या २०७ धावांत आटोपला. नेदरलँड्सच्या लोगान वॅन बीकनं तीन, तर पॉल वॅन मिकरेन, रोलॉफ वॅन डेन मरवे आणि बास डी लीडे यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी कर्णधार स्कॉट एडवर्डसनं ६९ चेंडूंत नाबाद ७८ धावांची खेळी करून नेदरलँड्सच्या डावाला मजबुती दिली. त्याला रोलॉफ वॅन डेर मरवेनं २९ आणि आर्यन दत्तनं नाबाद २३ धावांची खेळी करून छान साथ दिली.