चारा घोटाळ्याच्या डोरंडा कोषागार खटल्यात Lalu Prasad Yadav यांना 5 वर्षांचा कारावास, 60 लाखांचा दंड
चारा घोटाळाप्रकरणी राष्ट्रीय जनता दल अर्थात राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. या शिक्षेसह लालूंना साठ लाखांचा दंडही ठोठावण्यात आलाय. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टाने ही शिक्षा सुनावलीय. डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटी बेकायदेशीरपणे काढल्याच्या चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यादव यांना ही शिक्षा सुनावण्यात आलीय. १५ फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यांच्यासह ३८ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. यानंतर लालू प्रसाद यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. लालू प्रसाद यांना उपचारांसाठी तुरुंग प्रशासनाने रिम्समध्ये पाठवले होते. लालू प्रसाद हे रिम्स मधूनच कोर्टात उपस्थित होते. शिक्षा सुनावण्यापूर्वी सीबीआयने सर्व दोषींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली होती.























