एक्स्प्लोर
Iqbal Ansari on ABP Majha : सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तेव्हाच वाद संपला - इकबाल अन्सारी
Iqbal Ansari on ABP Majha : सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तेव्हाच वाद संपला - इकबाल अन्सारी बातमी इक्बाल अन्सारींबद्दल. राम जन्मभूमी केसमधील मुस्लिम पक्षाचे याचिकाकर्ते इक्बाल अन्सारी यांनी देखील आज राम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यांना अनेक दुवसांपूर्वीच निमंत्रण गेलं होतं, आणि आपण या सोहळ्याला जाणार असं त्यांनी तेव्हाच जाहीरही केलं होतं. मी स्वतः श्रारामाचा भक्त आहे, ज्या दिवशी केसचा निकाल लागला त्यादिवशी माझ्यालेखी तो वाद संपला, असं अन्सारी सांगतात. आज मंदिरात जाऊन खूप आनंद झाला, मी न्यायालयीन लढा लढलो, पण कोर्टाचा निर्णय आल्यावर मी त्याचं स्वागत केलं असं अन्सारी म्हणाले.
आणखी पाहा























