Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिदीत शास्त्रीय सर्वेक्षण सुरुच राहणार, सुप्रीम कोर्टाचे निर्देश काय?
वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिराजवळील ज्ञानवापी मशिदीचे आजपासून शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. वजुखाना वगळता हे सर्वेक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. वजुखाना येथे शिवलिंग असल्याने वजुखाना वगळता संपूर्ण ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती. हा परिसर सील करण्यात आला असून याबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट आहे. 14 जुलै रोजी ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी करणाऱ्या हिंदू पक्षकारांच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायाधीशांनी यावरचा निकाल राखून ठेवला होता.























