G N Saibaba : दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची निर्दोष मुक्तता, काय होते आरोप?
दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली.माओवाद्यांशी संबंध आणि त्यांच्या कारवायांमध्ये मदत केल्याच्या आरोपात त्यांना अटक करण्यात आली होती. तर साईबाबा यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेप सुनावली होती. त्यानंतर साईबाबा आणि इतर आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिले होते. जी एन साईबाबा आणि त्याचे सहकारी महेश तिरकी, हेम मिश्रा, विजय तिरकी आणि प्रशांत राही सांगलीकर या चारही जणांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केलीए... चारही जणांची इतर कुठल्या प्रकरणात चौकशीसाठी गरज नसेल तर त्यांना त्वरित सोडण्यात यावे असे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे.. गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने नक्षलवाद्यांशी संबंध ठेवून देशाविरोधात लढा उभारल्याच्या प्रकरणात जी एन साईबाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती... गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाच्या त्याच निर्णयाला जी एन साईबाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते... त्यानंतर नागपूर खंडपीठानं त्यांची निर्दोष सुटका केली... उ्च्च न्यायालयाचा निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी आज राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात मागणी केली होती.. ती मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळलीय