(Source: ECI/ABP News/ABP Majha)
EWS : आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा आज फैसला, 103 व्या घटनादुरुस्तीच्या वैधतेवर निर्णय ABP Majha
केंद्र सरकारनं दिलेल्या आर्थिक आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय होणार आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ याबाबत निकाल देणार आहे. 103 वी घटनादुरुस्ती करून केंद्र सरकारनं दिलेलं हे आरक्षण वैध आहे की नाही याचा फैसला सुप्रीम कोर्ट करणार असल्यानं या निर्णयाला ऐतिहासिक महत्त्व आहे. विशेष म्हणजे हा निर्णय देताना वेगवेगळी निकालपत्रं दिली जाणार असल्यानं निकालाची उत्सुकता आणखी वाढली आहे. सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांचं निकालपत्र एक आहे, तर न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती पारडीवाला या तीन न्यायमूर्तींचं वेगवेगळे निकालपत्र दिसत आहे. अनेकदा एकाच बाजूने निकाल असला तरी वेगळ्या मुद्द्यांवर सहमती असल्यास निकालपत्र वेगळं असतं. किंवा न्यायमूर्तींमध्ये मतभेद असतात तेव्हाही निकाल वेगळा असतो. पाच पैकी तीन न्यायमूर्ती आपला निकाल स्वतंत्रपणे देणार आहेत. दोन न्यायमूर्तींचं निकाल पत्र समान आहे.