एक्स्प्लोर
राममंदिरासाठी शिवसेनेच्या एक कोटीच्या घोषणेवर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणाले, अजून एक रुपयाही आला नाही!
शिवसेनेने राममंदिरासाठी एक कोटी दान देण्याची घोषणा केली होती. मात्र अजून यातील एक रुपयाही आला नसल्याचं राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मंदिर निर्मितीसाठी जो ट्रस्ट स्थापन झाला आहे त्याचे महंत नृत्य गोपाल दास अध्यक्ष आहेत. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, राममंदिर भूमिपूजनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सारे साधुसंत तयारीत आहेत. आता लवकरात लवकर मंदिर निर्माणाचे काम सुरू होईल
आणखी पाहा























